Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडावद येथे लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे कृषी कायद्यांची केली होळी

चोपडा प्रतिनिधी ।  तालुक्यातील अडावद येथे लाल बावटा शेतमजुर युनियन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ किसान सभा अंगणवाडी कर्मचारी आयटकतर्फे नेताजी सुभाष चौकात केंद्र सरकारचे  तीन काळे कृषी कायदे, कामगार विरोधी कोड व तसेच ग्रामपंचायत अडावदचे विकास अधिकारी यांनी सफाई कामगारांना देण्यात आलेली खोटी नोटिसांची  कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात होळी करण्यात येऊन निषेध व्यक्त केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले. दिलेला ७५ दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत ७० शेतकरी शहीद झाले आहेत. कामगारांनी लढून मिळवलेले ४४ हक्कचे कायदे रद्द करून कामगार कोडे बिल लादत आहे. हे सर्व कॉर्पोरेट वर्गाच्या भल्यासाठी चालले आहे. त्याविरोधात तसेच अडावद येथील ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी यांनी कर्मचारी यांना १०महिन्यांचे पगार दिले नाहीत प्रविदांत फंड भरलेला नाही कामाचे साहित्य झाडू, फावडे इत्यादी ही पुरेसे दिले नाहीत.  २६ जानेवारीला झेंडावंदन केले व नंतर तिसऱ्या दिवशी या त्रस्त  कमचाऱ्यांनी रीतसर २७ जानेवारी रोजी अर्ज देऊन पोंच घेऊन २८ तारखेला त्यांच्या कर्मचारी विषयी आक्षेपार्ह व्यवहार विरुध्द सामुदायिक रजा टाकली गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार दिली ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सल्ल्याने रजेचा निर्णय मागे घेतला तरीही ग्राम विकास अधिकारी यांनी प्रजा सत्ताक दिनाचा संदर्भ घेऊन  २९ तारखेला लिहिलेली नोटीस २ फेब्रुवारीस पोष्टात टाकून रजिस्टर पोस्टाने ३ तारखेला पगार व कामाचे आवश्यक साहित्य पुरेसे न देता असल्या त्रासाच्या विरोधात दिलेल्या नोटिसा जाळण्यात आल्या.

याप्रसंगी मुकादम कैलास सोनवणे, शांतीलाल सैदाने, हिरालाल सैदाणे, प्रकाश साळुंखे, सुकदेव सोनवणे, समाधान भालेराव, सुनील साळुंखे, भीमराव साळुंखे, जितेंद्र साळुंखे, शेतमजूर युनियनचे कैलास माळी, जगन भील, बचत गट कार्यकर्त्या सुंदरबाई कोळी, खटाबाई भोई, किसान सभाचे जिजाबाई राणे, राकेश महाजन, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शशिकला निंबाळकर  व इतर अनेक त्यावेळी हजर होते.

Exit mobile version