Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडावद येथील सबस्टेशनला अचानक आग; दोन फिडर जळून खाक (व्हिडीओ)

अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी)। दोन गावांना वीज पुरवठा करणारे दोन फिडरला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. रात्री उशीरापर्यंत ही आग सुरूच होती. दोन्ही फिडर पुर्णपणे जळून खाक झाले आहेत.

याबाबत अधिक असे की, अडावद येथे ३३ केव्ही आणि ११ केव्ही असे दोन सबस्टेशन फिडर आहेत. दोन्ही फिडरवरून चोपडा तालुक्यातील शेवरे आणि वडगाव बु या गावांना वीज पुरवठा केला जातो. दरम्यान मंगळवारी १४ रोजी रात्री पावसाचे पाणी सुरू असतांना अचानकपणे दोन्ही फिडरला आग लागली. फिडरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑईल असल्यामुळे आग विझविता आली नाही. तसेच आग विझविण्याचे गॅस सिलेंडर फक्त शो पीस म्हणून ठेवण्यात आलेले आहे. गॅस विझाविण्याचे सिलेंडर उपलब्ध झाले असते तर ही आग आटोक्यात आली असती.

आग इतकी भयंकर होती कि दूरून धूराचा डोंगर दिसत होता. गावातील नागरीकांनी उपकेंद्राकडे धाव घेतली. सर्व कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोवर प्रभारी वर्डीचे सहा.अभियंता पंकज बाविस्कर हजर झाले चोपडा नगर पालीकेची अग्निशामक बंब आल्यावर आग विझवण्यात आली.

रोहित्र जळल्याची माहिती मिळताच चोपडा येथील सहा.कार्यकारी आभियंता सावकारे उपस्थित झाले. कसलाही दाब नसलेल्या रोहित्राला आग कशी लागली याचे कारण अजून समजू शकले नाही.

 

रात्री उशीरापर्यंत ही आग सुरू होती. आगीचे कारण अद्याप कारण गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली.

Exit mobile version