Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडावद अँग्लो उर्दू शाळेत स्वतंत्रता दिन उत्साहात साजरा !

अडावद (प्रतिनिधी) येथील डॉ. मोहम्मद ईकबाल एजुकेशन सोसायटीद्वारा संचलित अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये आज  स्वतंत्रता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष तथा अडावद ग्रामपंचायतचे माजी सरपंच कबिरोद्दीन दिलफरोज यांच्याहस्ते करण्यात आले.

 

कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रथमच हा कार्यक्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. यावेळी सर्वाना सामाजिक अंतर व मास्क बंधनकारक करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव अ.रज्जाक शेख यासीन, माजी उपाध्यक्ष जहिरोद्दीन शेख हाशम, माजी अध्यक्ष फजलूलहक अब्दुल रऊफ, कार्यकारिणी सदस्य शेख ताहेर शेख ईकबाल, इमरान खान अय्युब खान, शाळेचे मुख्याध्यापक फारूक पटेल यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version