Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडकलेला पतंग काढतांना शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील कुसुंबा येथे पतंग उडवीत असतांना एका दहा वर्षीय बालकाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.

जळगाव येथील न्यू इंग्लिस मेडियमचा विद्यार्थी कुसुंबा, गणपती नगर येथील रहिवाशी हितेश ओंकार पाटील (वय १० वर्ष) हा सकाळी १२ वाजेच्या सुमारास पंतग उडवीत होता. त्याचा पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. हा पतंग काढत असतांना त्याला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. मकर संक्रांतीच्या दिवस दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version