Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट न ठेवता सर्वांना सरसकट रेशनचे धान्य वाटप करा : दिपक धांडे यांची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी। कोणतीही अट न ठेवता सर्वांना सरसकट रेशनचे धान्य वाटप करा अशी मागणी दिपक धांडे यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी , व्यवसायिक ,कष्टकरी,बांधकाम कारागीर , हातमजुरी करणारे हे सर्वच नागरिक गेल्या २२ तारखेपासून घरीच बसून आहेत. त्या ळे कमवणारे व्यक्तीच घरी असल्याने सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . त्यात रेशन दुकनदार फक्त प्राधान्य लाभार्थी म्हणजे ज्यांचे अन्न सुरक्षा यादीत नाव आहे असे व अंत्योदय लाभार्थी जांच्या जवळ पिवळे रेशन कार्ड आहे अशांनाच धान्य देत आहे. परंतु , शासनाने लॉक डाऊन हे सर्व नागरिकांसाठी केलेले आहे. त्यामुळे ज्यांच्या जवळ केशरी रेशन कार्ड आहे परंतु त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत नाही अशा कुटुंबावर हा अन्यायच आहे. तसेच बऱ्याच नागरिकांनजवळ केशरी रेशन कार्ड सुध्दा नाही आणि असे लोक सुध्दा शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहे म्हणून एक प्रकारे अशा नागरिकांवर हा अन्यायच आहे. शासनाने प्राधान्य लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी असे कुठलेच निकष न ठेवता सर्वांना सरसकट ३ महिने पुरेल असे धान्य त्यात गहू ,तांदूळ, ज्वारी, तूरडाळ, तेल, कांदे, बटाटे प्रत्येकाच्या घरी येऊन द्यावे जेणेकरून रेशन दुकानात गर्दी होणार नाही. यामुळे नागरिक रेशन घेण्यासाठी घराबाहेर पडणार नाहीत व त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. यातून शासनाचा लॉक डाऊनचा उद्देश सुध्दा सफल होईल व रेशन घेण्याच्या कारणाने लोक बाहेर सुध्दा येणार नाही. शासनाने ह्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोहाच द्याव्या ही विनंती करण्यात आली आहे.

Exit mobile version