Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराला प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल येथे आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या शिबीरात गावातील १०७ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर यातील १५ शस्त्रक्रीयेस पात्र रूग्णांना जळगाव स्थित कांताई नेत्रालयात शस्त्रक्रीयेकरीता पाठण्यात येणार आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रावेर यावल तालुक्यातील डॉक्टरांचे आश्रय फाउंडेशन व मित्र परिवारतर्फे नेत्रतपासणी व शस्त्रक्रियासाठीचे शिबीर संपन्न झाले. कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात सुमारे १०७ रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली.

यावेळी शिबिरात डॉ. कुंदन फेगडे यांच्या आश्रय फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसार्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ.वैभव शिंदे, सहायक पवन पाटील यांनी रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये पोलिस पाटील पवन चौधरी, युवराज देसर्डा, किरण महाजन, हेमराज खाचने, भगवान चौधरी, डॉ. राहुल चौधरी, सागर लोहार, विशाल बारीसह डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Exit mobile version