Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावल येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांविरोधात गुन्हा

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्यांच्या कुटुंबाचे महिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गावातील त्या दोघांतरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यावल तालुक्यातील अट्रावल गावात दि. २६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावातील सत्कार विद्या मंदिरा शाळेच्या पाठीमागे दोन अल्पवयीन बहिणी माती घेण्यासाठी गेल्या होत्या. संशयित आरोपी कैलाश विठ्ठल लोहार आणि सागर अनिल लोहार यांनी दोघं अल्पवयीन बहिणी माती काढत असतांना यातील कैलास लोहार याने एका तरुणीला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावेळी तरुणींनी त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेऊन घर गाठले त्यांनी झालेला प्रकार घरातल्या मंडळीला सांगितला. त्यानंतर अल्पवयीन मुलीचे कुटुंब हे संशयित आरोपीच्या घरी त्यास जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी कैलास लोहार यांने व त्यांच्यासोबत असलेल्या सागर लोहार यांनी लोखंडी रॉडने पीडित मुलीच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण केली म्हणून अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून त्या दोघा संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता केळकर हे पोलिस करीत आहे.

Exit mobile version