Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावल यात्रेत तरूणाला बेदम मारहाण; पोलीसात गुन्हा

Crime 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील राहणाऱ्या एका तरूणास काही अज्ञात तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत सार्वजनिक ठिकाणी घडली. याप्रकरणी अज्ञात तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील अष्ट्रावल येथे प्रसिद्धदेवस्थान मुंजोबा यात्रा सुरू असुन या यात्रेच्या दरम्यान आज काही अज्ञात तरुणांकडुन दहीगाव तालुका यावल येथील राहणाऱ्या शुभम संतोष पाटील यास बेदम मारहाण करून यात्रेतील शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न काही अज्ञात विघ्नसंतोषी मंडळी केल्याची घटना घडली असुन, याबाबत त्या अज्ञात तरुणांविरुद्ध यावल पोलिसात दहीगाव येथील शुभम संतोष पाटील यांने फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

शुभम पाटील हा अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत दर्शनासाठी गेला असता यात्रेत आलेल्या मोठ्या पाळण्यावर बसण्यासाठी तो गेला असता तेथे खाली पाळण्यात बसत असताना अज्ञात तरुणांनी पाळण्यात बसू नको असा दम देत त्याला बेदम मारहाण केली त्या अज्ञात तरुणांच्या हातात काळ्या काट्यांसारखी अवजारे होती ते तरुण नक्कीच यात्रेमध्ये हैदोस घालण्याच्या हेतु आले असावेत असा अंदाज यात्रेतील दर्शनार्थी व उपास्थित ग्रामस्थ करीत आहेत. दुखापत झालेल्या शुभम संतोष पाटील या तरुणावर यावल च्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून व त्यास पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत असुन , या मारहाणीत त्याच्या नाकाजवळ आणि डोळ्याजवळ हाडांना शुभम पाटील गंभीर दुखापत झाली असुन , शुभम पाटीत यांने यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून त्या अज्ञात तरुणांनी विरुद्ध भादवि ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यात्रेच्या ठीकाणी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हैदोस घालणाऱ्या तरुणांना पोलिसांनी त्वरित अटक करावी व त्यांना कडक शासन करावे अशी मागणी दहीगाव येथील ग्रामस्थ करीत आहेत.

Exit mobile version