Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावलच्या मुंजोबाने आज यात्रेच्या सव्वा महीन्यानंतर घेतला अग्नीडाग

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाने गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुंजोबाने अग्नीडाग घेतला आहे. यात्रेनंतर सव्वा महिन्याच्या अवधीतचच मुंजोबाने अग्नीचा घेतला आहे. अग्नीडाग घेतल्याचे समजताच पंचक्रोशीतील भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनासाठी धाव घेतली.

 

यावल तालुक्यातील अट्रावल येथील खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मुंजोबा ची यात्रा गेल्या महिन्यात माग शुद्ध पंधरवाड्यात पार पडली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे बंद, असलेली यात्रा यावर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत हजारो भाविकांनी यात्रा उत्सव काळात दर्शन घेतले यात्रोत्सवात भाविकांनी, मुंजोबास अर्पण केलेली पूजा, पत्री , लोणी यात्रोत्सवानंतर आपोआप पेट घेतात यालाच मुंजोबाने अग्नीडाग घेतल्याचे म्हणतात. मुंजोबा अग्नीडाग केव्हा घेईल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही. यावर्षी सव्वा महिन्याच्या अवधीतच मुंजोबाने अग्नीडाग घेतला आहे. अग्नीडाग घेतल्याचे समजताच पंचक्रोशीतील भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनासाठी धाव घेतली.

Exit mobile version