Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अटी-शर्तीनुसार व्यवसायाची परवानगी द्या : व्यापारी संघटनांची मागणी (व्हिडिओ)

 

भुसावळ, प्रतिनिधी ।येथील व्यापाऱ्यांना अटी-शर्ती लागू करून व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी रजा टाॅवर व्यापारी संघटना व भुसावळ शहर  व्यापारी  असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात सेमी लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉक डाऊनचा रजा टाॅवर व्यापारी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मागील एका वर्षापासून कोरोनामुळे व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे. यातच सध्या काही ठराविक दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे दुकानदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात ठराविक दुकानदारांना व्यवसाय करण्याची संधी देण्यात आलेली असून इतर व्यावसायिकांना परिवार नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा चालू केल्यास आम्ही देखील कोरोनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करू असे आश्वासन देण्यात आले आहे. यानिवेदानावर साबीर शेख, सिराज खान, अ. रहीम अ. रहेमान. युसुफ हसन, गुरु हसन बागवान, फिरोज रहेमान शेख आदीची सही आहे.

 

Exit mobile version