Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अज्ञात वाहनाच्या धडकेत शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा येथील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी नविन गोपालदास वासवानी (वय -२१) हा युवक ८ मार्च रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास घरासमोरुन जात असतांना एका अज्ञात चारचाकीने नविन वासवानी यास जोरदार धडक दिल्याने नविन वासवानी यास त्याचे नातेवाईक सेवकराम अर्जुनदास वासवानी यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी नविन यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिंधी कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दरम्यान आज ९ मार्च रोजी सकाळी पासुनच शहरातील सिंधी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

Exit mobile version