Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार!

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील पातोंडा – ओझर रोडवर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील पातोंडा – ओझर रोडवर एका अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत औरंगाबाद येथील ऋषीकेश चंद्रकांत दत्तात्रेय (वय-३७) या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटना घडताच अज्ञात वाहन चालकांनी वाहनांसह पसार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

Exit mobile version