अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णीकडून चिंचोली रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी ७ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर जोतमल चव्हाण (वय-३२) रा. फर्दापूर ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ईश्वर चव्हाण हा तरूण रविवारी ७ मे रोजी दुचाकीने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून चिंचोलीकडे जात असतांना दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ईश्वर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर श्रावण चव्हाण रा. फर्दापूर ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर याने पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहे.

Protected Content