Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना सावदा ते रावेर रोडवर घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण साहेबराव धामोळे (वय-३५) रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. २३ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास तो त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएम २४७३) ने सावदा ते रावेर रोडवरून रेणुका वाटिका समोरून दुचाकीने जात असताना अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत नारायण धामोळे हा तरुण जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक सुनील इंगळे यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहे.

Exit mobile version