Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू

wp 15807892337503431293444881637960

जळगाव प्रतिनिधी । लघुशंकेसाठी उभा असलेल्या ट्रक चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नशीराबाद गावाजवळ घडली. याप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संतोष भावलाल नन्नवरे (वय-30) रा. बाभोरी प्र.चा. हे ट्रकचालकाचे काम करतात. आज मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास नशीराबादकडून बांभोरीकडे ट्रकने इतर मजूरांसोबत जात असतांना त्यांनी नशीराबाद गावाजवळ ट्रक थांबवून लघूशंकेसाठी रोडवर उभे होते. त्यावेळी अज्ञान वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने ते दहाफुट दुर फेकले गेले. त्यांच्या डोक्यांचा गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या मजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी नशीराबाद पोलीसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नशीराबाद पोलीसात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version