Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण ठार

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडा येथील संतोष रामदास पाखरे या दुचाकीस्वाराचा जामनेर वरून घरी जात असतांना जैन इंटरनॅशनल स्कूल जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

संतोष पाखरे (वय३५) हा पळासखेडा येथील रहिवासी असून तो हात मजुरी ने काम करीत होता.कामावरून घरी परतत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत संतोष याचा जागीच मृत्यू झाला. मयत संतोष याच्या पत्नीचेही सुमारे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून त्याला तीन मुले आहेत. ते तिघेही मुले त्यांच्या मामाच्या गावी खामगाव येथे राहतात तर संतोष त्याच्या आई सोबत पळासखेडे बुद्रुक येथे राहत होता.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version