Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा ते शिरसोली गावदरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादाभाऊ रावण सोनवणे (वय-५५) रा. पिंपरी ता. पारोळा ह.मु. दापोरा ता.जि. जळगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील दापोरा येथे राहणारे दादाभाऊ सोनवणे हे आपल्या परिवारासह दापोरा येथे वास्तव्याला आहे. मंगळवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते रस्त्याने पायी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

 

Exit mobile version