Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी महिला जागीच ठार

death

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रति‍निधी । चाळीसगाव-मालेगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी वेडसर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आह.

मेहुणबारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-मालेगाव रोडवर असलेल्या वामन गुलाब पाटील यांच्या शेताजवळ एक अनोळखी वेडसर महिला बुधवारी २० जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पायी जात असताना अज्ञात वाहनाने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी महिला जागीच ठार झाली. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालक हा वाहन न थांबवता फरार झाला. या संदर्भात शेतकरी विष्णू पाटील यांच्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.

Exit mobile version