Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात माथेफिरूंनी पेट्रोल टाकून जाळल्या दोन कार व दुचाकी; संशयित सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अज्ञात माथेफिरूंनी मध्यरात्री पेट्रोल टाकून दोन कार व दोन दुचाकी जाळल्याची घटना तीन ठिकाणी घडली. यात एक कार व एक दुचाकी जळून खाक झाली तर उर्वरित दुचाकी आणि कार पेटवून दिल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी रामांनदनगर पोलिसात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पहिल्या घटनेत बॅरिस्टर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या बंगल्याच्या मागे राहणारे नीरज सुरेशचंद्र छाजेड (वय-३७) रा. रामदास कॉलनी यांच्या मालकीची दोन दुचाकी आहेत. १ जून रोजीच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपार्टमेंटमध्ये लावलेली दुचाकी (एमएच १९ बीझेड ६१८८) मोपेड गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. यात दुचाकी जळून खाक झाली तर बाजूला उभी असलेली टीव्हीएस मोपेड (एमएच १९ एझेड १२३७) आस लागून अर्धवट जळाली. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वाचमनच्या लक्षात आल्याने आरडाओरड केली. तातडीने पाणी टाकून ही आग विझविली. बाजूच्या अपार्टमेंटमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत संशयित कैद झाले आहेत.

दुसऱ्या घटनेत माजी आमदार गुरूमुख जगवानी यांच्या बंगल्याच्या बाजूला राहणारे सुभोद मोतीचंद बुद्देलखंडी (वय-५१) रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ रामदास कॉलनी यांची टोयोटा कार (एमएच १९ बीयू ७७४४) अपार्टमेंटच्या बाहेर पार्किंग करून बाहेर लावली होती. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास याच अज्ञात व्यक्तींनी उभी असलेली कार पेटवून दिली. कारने मोठ्याप्रमाणावर आग धरल्याने अग्नीशमन बंबाने ही आग विझविण्यात आली.

तिसऱ्या घटनेत गणपतीनगरातील शालिमार अपार्टमेंटमध्ये राहणारे गिरीष बंन्सीलाल मोतीरामाणी (वय-३६) यांचे नातेवाईक भारत तलरेजा रा. सिंधी कॉलनी यांनी आपली कार लॉकडाऊनमुळे सासरे बंन्सीलाल मोतीरामाणी यांच्याकडे फोर्ड कंपनीची कार (एमएच १९ सीयू ५५१५) पार्किंगला दीड महिन्यापासून लावली होती. मध्यरात्री १.४३ वाजेच्या अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकले व पेटवून दिल्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घरासमोरील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पहिल्यांदा कार पेटली नाही म्हणून पुन्हा संशयित कारजवळ येवून पुन्हा पेटवून दिली व मेन गेटमधून पळ काढला. बंन्सीलाल मोतीरामाणी यांच्या घराच्या बाजूला राहणारे करण पोपली हे कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी उठले तेव्हा कार पेटविल्याचे लक्षात आल्याने आरडाओरड केली. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेवून कारला लागलेली आग काही मिनीटात विझाविली. यात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे

सीसीटीव्हीत समाजकंटक कैद
नीरज छाजेड यांची दुचाकी जाळण्याच्या अगोदर रोडवर पाच मिनीट थांबले आणि नंतर दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटविल्याचे दिसून येत आहे. तर शालीमार आपार्टमेंटमध्ये संपुर्ण घटना कैद झाली आहे. यात आग लावल्यापासून ते आग विझविण्यापर्यंत सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version