Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजु शब्बीर तडवी, (वय-२८) रा. सांगवी ता. यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू शब्बीर तडवी हा तरूण आपल्या पत्नी रजीना तडवी यांच्यासोबत सांगवी ता. यावल येथे वास्तव्याला आहे. राजू तडवी यांचे साडू फिरोज तडवी हे रावेर तालुक्यातील गौरखेडा येथे राहतात. दरम्यान राजू हा ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी गौरखेडा येथे पत्नी रजीनासोबत आला आहोत. सायंकाळी साडेसात  वाजता जेवण झाल्यानंतर साडूचा मुलगा आदिल फिरोज तडवी सोबत लोहारा रस्त्यावर फिरण्यासाठी गेले. त्यावेळी भरधाव वेगाने येणारी दुचाकी (MP-10-ND 2438) ने राजू तडवी याला जोरदार धडक दिली. या अपघातात राजू तडवी हा गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार दुचाकी सोडून शेजारील शेतातील केळीच्या बागेतून पसार झाला होता. जखमी अवस्थेत राजूला फैजपूर येथील रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याबाबत घटनेबाबत आदिली फिरोज तडवी याने दिलेल्या फिर्यादीवरून MP-10-ND 2438 वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version