Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात चोरट्याकडून उघड्या घरातून रोकड व दोन मोबाईल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरातील असलेल्या बिलाल चौकात उघड्या घरातून अज्ञात चोरट्याने ५  हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

एमायडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलीम बेग रमजान बेग (वय-४३) रा. बिलाल चौक तांबापुरा हे बकरी ईदच्या निमित्ताने आज सकाळी ५.३० नमाज करण्यासाठी घरातून बाहेर पडले. तर घरातील महिला या घराच्या गच्चीवर गेल्या होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ५ हजार रुपयांची रोकड व अनुक्रमे ११ आणि ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी करीम यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Exit mobile version