Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांच्या वाढदिवसाला एका रुपयात 1 लिटर पेट्रोल

 

पुणे : वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून  पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे.

 

सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा  प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

 

पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे. आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

 

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन खुद्द अजित पवार यांनी केलंय.

 

Exit mobile version