Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजिंठा चौफुली दुकानासमोरून दुचाकी लंपास

bike chori 201895 102842 05 09 2018

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मानस हॉटेलजवळील सलार नगरात असलेल्या दुकानासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २६ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, लालु राधेलाल चौधरी (वय-३९) रा. मानस हॉटेलच्या जवळ सलार नगर यांचे अजिंठा चौफुलीजवळ बाबुंचे दुकान आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता दुचाकी क्रमांक एमएच १९/बीसी ८७१७ दुकानासमोर लावली होती. सायंकाळी घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ गेले असता ती मिळून आली नाही. दुचाकी चोरी गेल्याप्रकरण एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version