Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजिंठा चौफुलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या इदगाह कॉम्प्लेक्ससमोर भरधाव दुचाकीच्या धडकेत ३० वर्षीय गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सय्यद नाजीश मोहम्मद सिद्दीक (वय 34) रा. मारुड ता. यावल जि. जळगाव हल्ली मुक्काम भिकमचंद जैन नगर हा व्यवसायाच्या निमित्ताने जळगावात राहतो. मारुड  मित्र मोहम्मद खालीद सुरूर अहमद (वय- 30) गाडी दुरूस्तीच्या कामासाठी ११ मार्च रोजी दुपारी १ वाजता जळगावात आला होता. गाडीच्या काम करण्यासाठी दोघे नेरी नाकाकडून अजिंठा चौफुलीकडे जाणाऱ्या भंगार बाजारासमोर साईडला उभे होते, व गाडीचे काम करण्यासाठी गॅरेजला लावली. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास (एमएच १९ डीएम 0452) या क्रमांकाच्या दुचाकीने भारधाव वेगाने येऊन मोहम्मद खालीद याला जोरदार धडक दिली. यात मोहम्मद जबर जखमी झाले व डोक्याला मार बसल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रिक्षात नेऊन खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आज 12 मार्च रोजी सायंकाळी सय्यद नाजीश मोहम्मद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीत धारकविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश कोळी करत आहे.

Exit mobile version