Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजिंठा चौकात मालवाहू कंटेनर कलंडला; सुदैवाने चालक बचावला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीवर सुरतकडून अमरावतीकडे जाणारा मालवाहू कंटेनर मुख्य चौकातच रहदारीच्या ठिकाणी अर्जंट ब्रेक दाबल्याने पलटी झाला. त्यामध्ये कुठलीही प्रकारची जिवीत हानी नसून मोठ्या संकट टळले.

जळगाव शहरातील अजिंठा चौकात मंगळवारी २१ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ट्रकच्या पुढे चालणारा ट्रकमध्ये बसलेले प्रवाशी उतरवण्यासाठी या ट्रक चालकाने अर्जंट ब्रेक दाबल्याने सुरतवरून येणाऱ्या व अमरावती कडे जाणारा ट्रकच्या चालकाचा स्टेरिंगवरून ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाले नसून मोठे संकट टळले आहे. क्रेनच्या साह्याने या कंटेनरला पुन्हा उभे करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Exit mobile version