Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर ‘राफेल’चे भारतामध्ये लँडिंग !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. भारतीय वायुदलाला या विमानांमुळे प्रचंड मोठी शक्ती मिळाली आहे.

 

पाचही राफेल विमान अंबाला एअरबेसवर नुकतेच दाखल झाले आहेत. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कित्येक पटीने वाढणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांचा ताफा भारतात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. ही एक नव्या युगाची सुरुवात आहे. राफेल विमान भारतीय वायूसेनेत क्रांतीकार बदल घडवणार, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी फ्रान्स सरकारचेदेखील आभार मानले

Exit mobile version