Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर त्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह एकाविरुध्द गुन्हा दाखल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागात प्रिया विनोद सुरवाडे या विवाहितेने सोमवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत पोलिसांनी तपासाअंती पती व एका विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

शहरातील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागात प्रिया विनोद सुरवाडे (वय – २६) या विवाहितेने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान मयत प्रिया हिच्या भावाने प्रिया ही आत्महत्या करुच शकत‌ नसून तिचा घातपात झाला असावा. असा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाअंती पती व एका विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “प्रिया रमेश शहादेव हिचा विवाह दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी पाचोरा येथील पुनगाव रोडवरील गणपती नगर भागातील एम.एस.एफ.मध्ये कार्यरत असलेले विनोद राजू सुरवाडे यांचेसोबत झाला होता. लग्नानंतर प्रिया व विनोद यांच्यात किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. दरम्यान दि. ८ ऑगस्ट रोजी गणपती नगर भागातील राहत्या घरात पहाटेच्या सुमारास प्रिया हिचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मयत प्रिया हिचा भाऊ देवेन रमेश शहादेव यांने घातपाताची शंका व्यक्त केली होती.

या अनुषंगाने पाचोरा पोलिसांनी तपास केला. तपासाअंती प्रिया हिचा पती विनोद सुरवाडे व भोजराव खैरे यांचेविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा प्रिया हिचे वडिल रमेश भाऊराव शहादेव यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वसावे या करीत आहे.

Exit mobile version