Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर ”त्या” मृत व्यक्तीची पटली ओळख 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. मृताजवळ कुठलाही ओळखीचा पुरावा नसल्याने ओळख पटविण्याचे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रातर्फे करण्यात आले होते. अखेर आज मृताची ओळख पटली असुन पाचोरा शहरातीलच रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं‌. ३७३ / २३ नजीक कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल गोपाळकृष्ण सोनवणे यांनी घटनास्थळ गाठत घटनास्थळा सविस्तर पंचनामा केला असता मयता जवळ कुठलाही ओळखीचा पुरावा नसल्याने ओळख पटविण्याचे आवाहन वृत्त पत्रांसह सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते‌.

दरम्यान शहरातील मिलिंद नगर भागातील रहिवाशी मुकेश बाबु झुंज (वय – ५२) हे २ डिसेंबर पासुन घरी न आल्याने मुकेश झुंज यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेही मिळुन आले नाही. अखेर पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेखाली सापडुन मृत्यू झालेल्या ते अनोळखी इसम मुकेश झुंज हेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Exit mobile version