अक्सानगरच्या बाजारातून फेरीवाले हटवले (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  वाहतुकीला येणारा  व्यत्यय  आणि स्थानिक रहिवाशांना होणार त्रास , त्यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढू नये म्हणून आज महापालिकेच्या पथकाने दर बुधवारी भरणाऱ्या अक्सानगरच्या बाजारातून फेरीवाले हटवले. 

 

अक्सानगर परिसरात भरत असलेल्या  बाजारात जिल्हाभरातील व जिल्हाबाहेरील  ५०० ते ६०० विक्रेते येत असतात.  मोठ्या प्रमाणत विक्रेते येत असल्याने येथे  गर्दी होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी मनपा प्रशासनाकडे केली होती. यानुसार आज पोलीस व अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे  सकाळी ९ वाजता या किरकोळ विक्रेत्यांना हटवण्याची कारवाई केली. या कारवाईत १०० ते १५० विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पुढे सांगितले की, अक्सा नगरातील बुधवारच्या  बाजारात सकाळी कारवाई केल्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत कोणत्याही हॉकर्सला तेथे व्यवसाय करू दिला नाही. फुले मार्केटमध्ये  तसेच शहरात येणाऱ्या रस्त्यांवर  बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्यात येत असतात. यामुळे त्या परिसरातील नागरिकांना याचा अडथळा निर्माण होत असतो, फुले मार्केट येथे ६ रँँम्प तयार करण्यात आले असून बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्केटमध्ये जवळपास ९०० ते ९५० गाळे असून येथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या साडेचार ते पाच हजाराच्या घरात असते. यामुळे तेथे वर्दळ वाढू नये व ग्राहकांना मुक्तपणे वावर करता यावा, संपर्क टाळून सर्वांना खरेदीचा आनंद लुटता यावा यासाठी नियोजन करीत आहोत. यानुसार मनपाने जाहीर केलेल्या  नो पार्किंग झोनमध्ये पार्किग  करू न देणे,    आतमधील रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची पार्किंग ग्राहक किंवा दुकानदारांनी करू नये याबाबत आज सूचना देण्यात आल्या आहेत. गाड्या बेसमेंटलाच पार्क करण्यात याव्यात अन्यथा वाहतूक विभाग व मनपातर्फे कारवाई करण्यात येईल , अशी माहितीही त्यांनीं दिली .

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/892743047942716

 

Protected Content