Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अकोल्यात प्रहारच्या नेत्यावर गोळीबार !

gun afp

 

अकोला (वृत्तसंस्था) शहरातील कबूतरी मैदानावर प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

या हल्ल्यात पूंडकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय. घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे घटनास्थळापासून अकोट शहर पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. दरम्यान गंभीर जखमी तुषार पूंडकर यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

Exit mobile version