Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अकोला परिमंडळातील कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंत्यांचे वीज बिल वसुलीचे आवाहन

 

बुलढाणा  :प्रतिनीधी । अकोला परिमंडळातील महावितरणच्या तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले आहे

 

अकोला परिमंडळातील वीज ग्राहकांची थकबाकी  मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे सर्वांनी थकित वीज बिलाची वसुली या एकाच विषयाकडे 31 ऑगस्टपर्यंत लक्ष देऊन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. अकोला परिमंडळातील NPS च्या यादीतील जवळपास 42 ते 43 हजार ग्राहकांची यादी अजून बाकी आहे या यादीवर पाच दिवसात लक्ष देऊन थकबाकी वसुल करण्यात यावी असे मुख्य अभियंता  अनिल डोये यांनी म्हटले आहे

 

थकबाकी प्रचंड वाढल्यामुळे अकोला परिमंडळ रेड झोनमध्ये आले आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून ही बाब भूषणावह नाही. कर्मचाऱ्यांना दिलेली NPS ची यादी सर्व कर्मचाऱ्यांनी  25 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून परिमंडळाचे नाव रेड झोनमधून कमी कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे. पाच टक्के उपद्रवी ग्राहक सोडले तर इतर ग्राहकांकडे संपर्क साधून 70% पार्टपेमेंट करून भरून घेण्यासाठी  मुख्य अभियंता यांनी परवानगी दिली आहे. तांत्रिक कर्मचार्‍यांकडे ब्रेक डाउन, मीटर रिप्लेसमेंट , मेंटेनंन्स इत्यादी कामाकरिता एजन्सीची मदत घेण्यासाठी कार्यकारी अभियंता यांना सुचविले आहे. थकबाकी वसुली संदर्भात सूचना , तक्रारी असल्यास अधीक्षक अभियंता  पवनकुमार कछोट यांच्याशी संपर्क साधण्याकरिता  सांगितले आहे असेही ते म्हणाले.

Exit mobile version