Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अकोट शहरात क्षुल्लक वादातून एकाचा खून

अकोट (वृत्तसंस्था) क्षुल्लक वादातून अकोट शहरातील एकाची चाकूचे वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. शहरातील धारुळी वेस भागात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

 

मुदासिर अली मुख्तार अली असे मृतकाचे नाव असून, पोलिसांनी आरोपी अब्दुल शाहरुख अब्दुल राजिक याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रमजान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृतक मुदासिर अली मुख्तार अली याचा लहान भाऊ व आरोपी अब्दुल शहारुख अब्दुल राजिक यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर २८ मे रोजी ‘तु माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ असे म्हणत आरोपी अब्दुल शहारुख यांने आपल्या हातातील चाकुने मुदासिर अली याच्या छातीच्या डावे बाजूला सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन खाली पडलेल्या मुदासिर अली याला रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Exit mobile version