Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंधरात रिक्षा विहिरीत पडल्याने तिघांचा दुदैवी मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर मोठा अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात रिक्षासह प्रवाशी विहिरीत पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे सोमवारी रात्रीच्या वेळेस अपघात झाला.

 

सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा या मार्गावरुन जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच 12 क्यूई 7706) ही विहिरीत पडली. रिक्षेतून प्रवासी प्रवास करत होते. त्यात दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका दाम्पत्याचा समावेश होता. विहिरीत पडलेल्या दोघांना जीवंत रेस्क्यू टीमने सकाळीच बाहेर काढले.

 

रिक्षेतून दोघांना जिवंत काढण्यात आल्यानंतर अजून तीन जण अजूनही विहिरीत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमने पुन्हा बचावकार्य सुरु केले. त्यानंतर तिघांचा मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात आले. या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील आहे.

 

दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले एक नवविवाहित दाम्पत्य रिक्षेतून प्रवास करत होते. अपघातात ते ही विहिरीत पडले. श्रावणी संदीप शेलार (वय 17), रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18 ) या तिघांचा मृत्यू झाला आहे.लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात होते. परंतु संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच या नवदांम्पत्याचा अंत झाला. आदित्य मधुकर घोलप (वय 22), शितल संदीप शेलार (वय 35) हे जखमी झाले आहेत.

Exit mobile version