Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंजनी नदीवरील पूल तसेच धुरखेडा – कामतवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार ! : पालकमंत्री

धरणगाव-प्रतिनिधी –  नारणे – बाभुळगाव दरम्यान अंजनी नदीवरील पूल  शासनाच्या बजेट अंतर्गत तसेच धुरखेडा – कामतवाडी – भामर्डी – पष्टाणे  रस्त्याचा प्रश्न मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारणे येथील पाणीपुरवठा योजनेच्या व विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत केले.

 

गुणवंतांचा झाला सत्कार !

याप्रसंगी नारणे गावातील इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 11 गुणवंत विद्यार्थ्यांचा ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील युवा कीर्तनकार ह.भ.प.अतुल महाराज यांचे विशेष सत्कार पालकमंत्र्यांनी केला. यावेळी बोलताना ना गुलाबरावजी पाटील यांनी सांगितले की, नारणे गावासाठी व्यायाम शाळा, सभामंडप तसेच स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची काँक्रिटीकरण इत्यादी कामेही लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी घोषित केले.  याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले

 

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमास सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर , शाखा प्रमुख जितेंद्र मराठे, भाजपचे जेष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे, पं. स. माजी सभापती डी.ओ.पाटील, तालुका उपप्रमुख मोतीआप्पा पाटील, शिवसेना गटनेते विनय भावे, शहर प्रमुख विलास महाजन. बांभोरी प्र चा भिकन  नन्नवरे , वाल्मीक पाटील, रवींद्र कंखरे, प्रवीण नारखेडे, पद्माकर अत्तरदे, राजेंद्र वाणी. डॉ सरोज पाटील.प्रिया इंगळे पंचक्रोशीतील सरपंच तसेच शिवसेना युवा सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच सुमनताई पाटील, उपसरपंच पूनम सोनवणे, ग्रा पं सदस्य विकास बाविस्कर, रवींद्र चव्हाण तसेच विजय चव्हाण, नवल कोळी, गोरख चव्हाण, राजेंद्र चव्हाण, रवींद्र पाटील, साहेबराव भिल्ल, भास्कर कोळी, भैय्या बाविस्कर, हिरालाल पाटील, विश्वास पाटील, प्रवीण चव्हाण, शांताराम मराठे, गोमा नाईक, अतुल महाराज तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.  यावेळी सभेसाठी गावातील महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तत्कालीन गट शिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र मराठे यांनी केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मागण्यांचे लेखी निवेदन ना. गुलाबराव  पाटील यांना देण्यात आले. त्याबद्दल ना. पाटील यांनी विशेष कौतुक केले तसेच आवश्यक ते प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबतच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Exit mobile version