Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी ठार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा शिवारात शेतात काम असतांना अंगावर वीज कोसळल्याने वृध्द शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली आहे. याप्रकरण फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानदेव धनु चौधरी (वय ६०) रा. आमोदा ता. यावल जि.जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, आमोदा येथील रहिवासी ज्ञानदेव धनु चौधरी हे आमोदा शिवारातील आपल्या शेतात बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास काम करत होते. दरम्‍यान अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊ लागला. त्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्‍यांचा जागीच ठार झाला. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने मुले उघड्यावर पडले आहे.

 

पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा केला. शेतकऱ्याला व कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version