Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंगणातील गव्हाच्या पोत्यांवर अज्ञातांकडून औषधाची फवारणी

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील जुने जळगावात एका शेतकऱ्याने अंगणांत ठेवलेल्या १० क्विंटल गहुच्या पोत्यांवर अज्ञात व्यक्तीने फिनाईल सारखे औषध टाकून पसार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

जुने जळगावातील गायवाड़ा परिसरातील सोपन चुनीलाल खडके यांनी शेतातून नुकतेच १० क्विंटल गहू काढून घरी आणून ठेवला होता. त्यांनी तो सर्व माल आपल्या अंगणांत झाकून ठेवला होता. मंगळवार १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर सुमारे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या गव्हांच्या पोत्यांवर फिनाईल सारखे औषध ओतून दिल्याचे आज सकाळी दिसून आले प्रकाराने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले. यात सोपान खडके यांच्या सुमारे २० – २५ हजारांचे रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे.

Exit mobile version