अंगणवाडी सेविका मदतनिसांचे सेवानिवृत्तीच्या एक रकमी लाभासाठी बोंबाबोंब आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना राज्य शासनाने सेवानिवृत्तीचा लाभ एक रकमी न दिल्यास शनिवार १८ जून रोजी आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषदेसमोर आयटकचे राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलनाद्वारे देण्यात आला.

 

याबाबत सविस्तर असे की, २० वर्षे सेवानंतर सेविका १ लाख रुपये मदतनीस ह्यांना ७५ हजार रुपये भारतीय जीवन विमा कंपनी मार्फत,देण्याचा राज्य शासनाचे परिपत्रक आहे. सन २०१८ पासून सेवानिवृतती झालेल्यांना राज्य सरकारने विमा कंपनीचे हप्ते न भरल्याने या वयोवृध्द सेविका मदतनीस यांना रकमा मिळू शकल्या नाहीत. त्या सरकारने त्यांना गेल्या चार वर्षापासून न दिल्याने त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. मार्च महिन्यात राज्य सरकारने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत पण. या मंजुरीला एक दीडमहिन्याचा कालावधी लोटून सुद्धा सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना लाभ मिळाला नाही. हा लाभ त्वरित मिळावा यासाठी जिल्ह्यातील वयोवृद्ध सेवानिवृत्त सेविका मदतनीस यांनी आयटकचे राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनात शशिकला निंबाळकर, सरला देशमुख पाटील, सुशीला पाटील, पुष्पा पाटील, सुमन भालेराव, प्रमिला पाटील, शांताबाई कोळी, कुसुम बोरसे, राजू बाई चौधरी, कमल पाटील आदींनी भाग घेतला. चोपडा, जळगाव, भडगाव, रावेर, यावल तालुक्यातील महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जिल्हापरिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी अजय पाटील यांना निवेदनात इशारा देण्यात आले. निवेदनात या बाबतीत निवृत्ती लाभाची रक्कम येत्या आठ दिवसाचा आत न दिल्यास जिल्ह्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस येत्या १८ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करतील इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनासाठी देवीदास पाटील धरणगाव, संजय कंडारी रावेर. कविता सरोदे भुसावल या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा व सहकार्य केले.

Protected Content