८ अटींवर रियाला जामीन

न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ शकत नाही

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर केला. एनसीबीने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तिला अटक केली होती. बेल ऑर्डरमध्ये रियासाठी ८ अटी होत्या. ..

रियाला १ लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन दिला जाईल. रियाला आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागेल. एनडीपीएस, मुंबईच्या विशेष न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय रिया देश सोडून जाऊ शकत नाही. रिया मुंबईच्या बाहेर जाणार असेल तर तिला तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल आणि प्रवासापूर्वीच तिला प्रवासाबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. रियाला पुढील सहा महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत तपासणा यंत्रणेच्या कार्यालयात उपस्थिती नोंदवावी लागेल. जोपर्यंत योग्य कारण देण्यात येणार नाही तोवर रियाला कोर्टाच्या तारखांना हजर रहावंच लागेल. पुरावा किंवा तपासात रिया छेडछाड करू शकत नाही. जामीनावर सोडल्यानंतर पुढील १० दिवस रियाला सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात हजर रहावे लागेल, अशा या अटी आहेत .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.