जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौफुली परिसरातील हॉटेलातून मोबाइल लांबवणाऱ्या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार ९ फेब्रुवारी रोजी मुसक्या आवळल्या आहेत.गोविंदा आधार पवार (वय ३१, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अजिंठा चौफुली परिसरातील ईदगाह कॉम्प्लेक्समध्ये जमजम नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलातील मॅनेजर शाहरुख सिकंदर खान वय २८ रा. नशीराबाद याचा काऊंटरवर ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी लांबवल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल चोरटा रामेश्वर कॉलनीतील असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पोलिस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, संदीप सावळे नितीन बाविस्कर, राहूल पाटील प्रीतम पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने बुधवारी रामेश्वर कॉलनीतून संशयित गोविंदा पवार याला अटक केला.