नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन हजार रूपयांची नोट बंद करण्याच्या निर्णयावर जोरदार टिका केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आज नाशिकमध्ये असून त्यांनी स्थानिक पत्रकारांशी वार्तालाप केला. यात त्यांनी नोटबंदीवर भाष्य केले. राज ठाकरे यांना मोदी सरकारच्या काळातील नोटबंदी फसली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, मी या गोष्टी तेव्हाच बोललो होतो. मला जे प्रश्न विचारले जातात ते सरकारमधील लोक आल्यावर विचारले जात नाहीत. नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केले होते. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितले नव्हते. हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.