हिशोब तर द्यावाच लागणार ! : किरीट सोमय्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केला असून त्यांना हिशोब तर द्यावाच लागणार आहे, अशा शब्दात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पत्रा चाळ प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी धडक देऊन त्यांची चौकशी सुरू करताच याच्या विविध राजकीय पक्षांतर्फे प्रतिक्रिया येण्यास प्रारंभ झाला आहे. यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची गेल्या अनेक महिन्यांपासून राऊत यांच्याविरूध्द चांगलीच जुंपली असल्याने त्यांनी यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, १२०० कोटी रुपयांचा पत्राचाळ घोटाळा असो. वसई नायगावमधील बिल्डरचा घोटाळा असो. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रच लुटण्याचा उद्योग सुरू होता. माफियागिरी, दादागिरी करत प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी देण्यात येत होती. आता या सगळयाचा हिशोब माफिया संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागणार, असे सोमय्या म्हणाले आहेत. राऊत यांनी अलीकडच्या काळात अनेकांवर अनाठायी टिका केली असून अतिशय खालच्या भाषेचा वापर केला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: