हिंगोणा येथे सर्पदंशाने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शेअर करा !

न्हावी प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी असलेल्या वत्सला मनोहर वारके यांना साप चावल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे.

store advt

अधिक माहिती अशी की, हिंगोणा येथील रहिवासी वत्सला मनोहर वारके (वय-५२) या दि. २ जुलै रोजी पहाटे पाऊणे पाच वाजेच्या सुमारास चुलीवर पाणी तापविण्यासाठी उठले तसेच चूल पेटवण्यासाठी सरपण घेतले असता त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला सापाने चावा घेतला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे उपचारार्थ आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेतून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतू त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील शासकीय जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र साप (नाग) अतीविषारी असल्यामुळे त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने हिंगोणा परिसरात शोक व्यक्त होत आहे.याआधीही अशाच स्वरूपाच्या घटना यावल व रावेर तालुक्यात घडल्या आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!