पुणे प्रतिनिधी । इंदुरीकर महाराज हे समाज प्रबोधनाचे कार्य करत असल्याचे सांगत मनसेच्या पदाधिकारी रूपाली पाटील-ठोंबरे यांनी एक व्हिडीओ जारी करून हा पाहिल्यावरच महाराजांविषयी बोला असे तृप्ती देसाई यांना आव्हान दिले आहे.
कथित वादग्रस्त प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी लाऊन धरली आहे. मात्र इंदुरीकर यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. यात आता मनसेची भर पडली आहे. मनसेच्या पुणे येथील पदाधिकारी रूपाली पाटील-ठोंबरे यांनी इंदुरीकरांची पाठराखण केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत इंदोरीकर महाराज मुलींचे महत्त्व समाजाला कीर्तनातून सांगत असल्याचं दिसतं.
या व्हिडिओत महाराज म्हणतात की, एक हजार मुलांमध्ये ९३५ मुली असा जन्मदर आहे. ६५ मुली हजाराला कमी आहे, याला एकमेव कारण सोनोग्राफी आहे, मुलगी व्हायलाच पाहिजे, जगातील सर्वात मोठं पाप स्त्रीभ्रूण हत्या आहे. काही महिला मुलगी झाल्यावर तोंड पाडतात पण का? तुम्ही पण मुलगी होता ना, तुमच्या बापाने जमिनी विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना, मग मुलगी व्हायलाच पाहिजे. लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पैशाचं सोंग आणता येत नाही, शेतकर्याने जोडधंदा करा, पण मुलगी शिकवा, मुलींसाठी अनेक योजना सरकार देतं त्याचा फायदा घ्या असं महाराज सांगताना दिसतात. हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवरून शेअर करून रूपाली पाटील-ठोंबरे यांनी इंदुरीकर महाराजांचे समर्थन केले आहे.
पहा : रूपाली पाटील-ठोंबरे यांनी शेअर केलेला इंदुरीकर महाराजांचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/rupalipatilthombare/videos/177044410390405