…हा भाजपने केलेला महाराष्ट्राचा अपमान होय – महेश तपासे

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा |  देहु येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हा भाजपने महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देहु येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. अजित पवार यांना राज्यातील शेतकऱ्यांचे, कास्तकर्‍यांचे त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे देखील प्रश्न माहीत आहेत. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी कार्यक्रम होत असताना महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हा अपमान जाणुनबुजुन करण्यात आला का? हा महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रकार होता का? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!