औरंगाबाद (वृत्तसंस्था) ‘हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे’, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावल्याचे वृत्त आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामुळे काही काळासाठी सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. मात्र काही काळासाठी हा राडा सुरूच होता. या राड्यानंतर सुप्रिया सुळे या वाकचौरे आणि गोर्डे या दोघांना घेऊन पैठण शहराबाहेर गेल्या. संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा दम भरल्याचे कळते.