नवी दिल्ली: वृत्तसंस्था । हाथरस गुन्ह्याचा सीबीआय करत असलेला तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, तपासानंतरच हा खटला उत्तर प्रदेशातून दिल्लीला वर्ग करायचा की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सीबीआय हायकोर्टाला जबाबदार असेल, असे कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान,
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/advt-1.jpg)
खटला दिल्लीत चालवला जावा असा अर्ज पीडित कुटुंबाने सुप्रीम कोर्टात केला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या ए. एस. बोपन्ना आणि न्या रामासुब्रमणियव याच्या पीठाने जनहीत याचिकेवर, तसेच वकिलांनी दाखल केलेल्या इतर याचिकावरील आपला निर्णय राखून ठेवला होता. उत्तर प्रदेशात निष्पक्ष सुनावणी होणे शक्य नाही कारण कथित रुपात हा तपासात ढवळाढवळ करण्यात आली आहे असे याचिकेत म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यात या तरुणीचा मृत्यू झाला. विरोध असतानाही पोलिसांनी या तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या नंतर उत्तर प्रदेश पोलिस प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहेत.