हाथरस ; मुंबईत गुन्हा नोंदवून पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशात पाठवा

आमदार प्रताप सरनाईक यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी

मुंबईः वृत्तसंस्था । ‘हाथरस योगी सरकारने अत्यंत बेजाबाबदार, अमानवी पद्धतीने हाताळल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशात पाठवावे,’ अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

‘ज्या प्रमाणे सुशांतसिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलीसांनी तक्रार दाखल केली होती. त्याचप्रकारे हाथरसचाही मुंबईत गुन्हा नोंदवून घ्यावा. भविष्यात सीबीआयकडे सोपावलं तरी आम्हाला काहीच हरकत नाही,’ असंही सरनाईक म्हणाले आहेत.

‘हाथरसमधील पीडित तरुणीचे अंत्यसंस्कार रात्रीच्या वेळी करण्यात आले, यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आङेत. त्यामुळं महाराष्ट्रातदेखील याप्रकरणी तक्रार दाखल व्हायला हवी, मुंबई पोलिस उत्तर प्रदेशमध्ये जाऊन संपूर्ण घटनेची चौकशी करतील,’ अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.