हाथरस प्रकरणातील दोषींना भरचौकात फाशीची शिक्षा द्या

रिपाईची मागणी

यावल, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे नराधमानी एका दलीत वाल्मीकी समाजाच्या मुलीवर केलेल्या सामूहीक बलात्कार व नंतर तिचा अमानुष छळ करून मृत्यूस जबाबदार ठरलेल्या नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )च्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात रिपाईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे दिनांक १९ सप्टेंबर रोजी दलीत समाजाच्या मनीषा वाल्मिकी या तरूणीवर काही विकृत विचार शरणीचा नराधमानी तिच्यावर सामुहीक बलात्कार करून तिचा अमानुषपणे शारीरिक छळ करून तिची निघृण हत्या केली. अशा मनोविकृत नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा देवुन देशाला कलंकित करणाऱ्या या निदंनिय घटनेचा हा काळीमा पुसुन काढावा अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट )चे यावल शहराध्यक्ष विष्णु टीकाराम पारधे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महीला कार्यकर्त्यांनी निवासी नायब तहसीलदार व पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सुभाष उमाकांत गजरे, पकंज रमेश बारी, नरेन्द्र भिमराम गजरे , रमेश सुधाकर भोई, समाधान आत्माराम तायडे , शरीफ खान गफुर खान , आकाश मधुकर बिऱ्हाडे, ईश्वरलाल नारेकर, एस.बी. पारधे , श्रावण भोई , संतोष सावकारे आदी नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.