हाथरस पीडिता प्रकरण : फास्ट ट्रॅक कोर्टांत खटला चालवा

युवक राष्ट्रवादीची मागणी

 

रावेर, प्रतिनिधी । उत्तर प्रदेश येथील हाथरस या ठिकाणी दि. १४ रोजी एका तरुणीवर काही नराधमांकडून बलात्कार करण्यात आला. व अत्यंत क्रूर पद्धतीने तिला मारण्यात आलं अशी घटना घडली असून सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी युवक राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे करण्यात आली आहे.

हाथरस येथील दुर्दैवी घटनेतील पीडितेस न्याय मिळावा. तिच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन रावेरचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, प्रणित महाजन, कुणाल महाले, शुभम पाटील, गौरव महाजन, निखिल महाजन, सुयोग पाटील, धनराज महाजन, किशोर पाटील, प्रतिक महाजन, विक्रांत मराठे, विजय माळी, शुभम मराठे आदी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.