हातले धरणाजवळ दांपत्याचा निर्घृण खून

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील हातले व वाघले धरणाच्या दरम्यान दांपत्याचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली असून घटनास्थळी पोलीस पोलीस दाखल झाले आहेत.

store advt

प्राप्त माहितीनुसार, एक दांपत्य धरणाजवळ झोपडी करून राहत होते. काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून दोन्हींना ठार केले. पत्नीचा मृतदेह झोपडीत आढळला तर पतीचा मृतदेह घटनास्थळापासून ५० फूट अंतरावर आढळून आला. या घटनेत मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राचा वापर केल्याचे दिसून येत आहे. नेमका हे खून कशामुळे झाले, हे अद्याप समजू शकले नाही, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!